शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न, राजू शेट्टींसोबत ताराराणी आघाडीची बैठक : खासदार निधीतून कूपनलिकां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:06 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न

इचलकरंजी : वारणा नळ योजनेला होणारा विरोध पाहता कृष्णा नळ योजनेची दुरुस्ती आणि पंपाची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. म्हणून शासनाच्या साहाय्याने कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याचा त्वरित प्रयत्न करण्याचा निर्णय खासदार राजू शेट्टी व ताराराणी विकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात विविध ठिकाणी ८७ कूपनलिका खोदण्यात येतील, अशीही माहिती खासदार शेट्टी यांनी यावेळी दिली.

दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी आणणारी नळ योजना गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. सुमारे ८२ कोटी रुपयांच्या योजनेपैकी वारणा नदीकाठावर जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींच्या उभारणीची निविदा आर. ए. घुले या मक्तेदारांना देण्यात आली असून, निविदेची मुदतही जानेवारी महिन्यात संपली आहे. वारणा नदीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी नदीकाठावरील गावांचा होणारा तीव्र विरोध त्याला कारणीभूत असून, आता ही नळ योजना अनिश्चितेच्या फेºयात अडकली आहे.

अशा पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी व ताराराणी विकास आघाडीमध्ये जलतरण तलावावरील कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीसाठी ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, संजय तेलनाडे, राजवर्धन नाईक, इकबाल कलावंत, भाऊसाहेब आवळे, महादेव गौड, विजय भोसले, आदी उपस्थित होते.

वारणा नळ योजनेला होणारा विलंब पाहता सध्या कार्यान्वित असलेल्या कृष्णा नळ योजनेची सडलेली ८ किलोमीटरची दाबनलिका बदलून घेणे. तसेच ‘पंचगंगा व कृष्णे’तून पाणी उपसा करणारे पंप बदलणे. जेणेकरून प्रत्येक उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई भासणार नाही, असा निर्णय या बैठकीत झाला.

तसेच नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी असलेली दुकान गाळ्यांची लिलाव प्रक्रिया चालू ठेवावी, ज्यामुळे पालिकेला ७२३ गाळ्यांपासून वार्षिक सुमारे ४.५ कोटी रुपये भाडे मिळाले. नजीकच्या दोन महिन्यांत खासदार निधीतून शहरात विविध ठिकाणी ८७ कूपनलिका खोदल्या जातील, असेही ठरले. याशिवाय खासदार शेट्टी यांनी शहराचा संपर्क वाढवावा, असेही त्यांना सूचित केले.यंत्रमागासाठी सवलतइचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे एक शिष्टमंडळ खासदार शेट्टी यांना याचवेळी भेटले. असोसिएशनचे संचालक चंद्रकांत पाटील, नारायण दुरूगडे, आदींनी यंत्रमाग क्षेत्राविषयी निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा त्यांच्यासमोर घेतला.तसेच यंत्रमागासाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट एक रुपयाची सवलत आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी पाच टक्के अनुदान सरकारने ताबडतोब देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.यंत्रमागधारकांच्या या मागण्यांसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.